⚡वेंगुर्ले ता.२४–: तालुक्यातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे वेंगुर्लावासीयांनी तालुका भाजपाच्या नेतृत्वाखाली येथील वीज वितरण कार्यालयास धडक देत उपअभियंता खटावकर यांना जाब विचारला. गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना विजेचा लपंडाव सुरु असून त्यामुळे गणेश मूर्तीकार अडचणीत आले आहेत. विजेचा हा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी भाजपाचे शरद चव्हाण, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, दिलीप गिरप यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वेंगुर्लावासीय उपस्थित होते. गणेश चतुर्थी काळात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल असे आश्वासन खटावकर यांनी दिले.
