हर घर तिरंगा या उपक्रमाचा यशस्वी प्रचार केल्याने विनायक धुरी यांचा करण्यात आला गौरव…

देवगड-प्रतिनिधी
देवगड तालुक्यात चित्ररथाद्वारे हर घर तिरंगा बाबत यशस्वीपणे प्रचार प्रसिद्धी केल्याबद्दल तसेच पाणी व स्वच्छता विभागात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेंद्र महाले यांच्या हस्ते पाणी व स्वच्छता विभागाचे विनायक धुरी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकुर , पोलीस निरीक्षक निळ्कंठ बगळे, उपनिरीक्षक दशरथ चव्हाण , देवगड पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोद्धा प्रसाद गांवकर , माजी सभापती सुनिल पारकर, माजी पंचायत समिती सदस्य अपूर्वा तावडे , आदी मान्यवर उपस्थित होते .
सिंधुदूर्ग जिल्हात लक्षवेदी ठरलेला चित्ररथाद्वारे देवगड तालुक्यात यशस्वी प्रचार प्रसिद्धी केल्याबद्दल पंचायत समिती देवगड द्वारे विनायक धुरी यांचा सन्मान करण्यात आला ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगाबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली होती . तर सडा शाळेचे शिक्षक सचिन जाधव यांच्या कल्पकतेतुन या रथाची मांडणी करुन या चित्ररथाला मोलाचे सहकार्य कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी केले.
फोटो- पाणी व स्वच्छता विभागाचे विनायक धुरी यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेंद्र महाले आदी.

You cannot copy content of this page