आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून विद्युतप्रवाहिनी करण्यात आली कार्यान्वित…
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील दांडी येथे दांडी शाळा ते श्री. गोविंद धुरी घरापर्यंत थ्री फेज विद्युतप्रवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या प्रयत्नाने व शिवसेना महिला उपजिल्हा संघटक तथा माजी नगरसेविका सौ. सेजल परब, माजी नगरसेविका सौ. तृप्ती मयेकर, माजी नगरसेवक श्री. पंकज सादये, शिवसेना उपशहर प्रमुख श्री. सन्मेश परब यांच्या पाठपुराव्यातून ही थ्री फेज विद्युत प्रवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे.
थ्री फेज विद्युत प्रवाहिनी कार्यान्वित झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शशांक मालंडकर, वरद धुरी, सचिन गवंडे, शितल तारी, प्रफुल्ल दुधवडकर, बाबू राऊळ, श्री. मिटकर आदी व इतर उपस्थित होते.
