भटक्या कुत्रीच्या आठ पिल्लांच्या जेवणाची केली व्यवस्था

मंगेश तळवणेकर यांच्यातील प्राणी प्रेम झाले जागे;पिल्लांना दूध देण्यासाठी नागरिकांना केले आवाहन

⚡सावंतवाडी ता.२२-: चराठे गावडेशेत परीसरात एका भटक्या कुत्रीने ८ पिल्लांना जन्म दिला. ती कुत्री दोन दिवस उपाशी होती. नंतर एका व्यक्तीने मंगेश तळवणेकर यांना फोन केला. त्यानंतर त्या कुत्रीला एका घराच्या पडवीत सुरक्षित आश्रयाला ठेवून कुत्रीची दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था व सायंकाळी नाष्ट्याची व्यवस्था केली आहे

. ८ पिल्लांना दुध पाजायला ती सक्षम असली पाहिजे. तरी सर्वांना विनंती आहे, समाजाने याचे भान ठेवून ८ व्यक्तीनी त्या पिलांचे पालकत्व स्वीकारावे असं आवाहन माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी केली आहे. मोबा. ९४२१२६९४४४, ८८०६५४२४२४ वर संपर्क साधावा पिलांना घरपोच करण्यात येईल अशी माहिती दिलीय.

You cannot copy content of this page