मालवणात वीज वितरण कंपनीविरोधात काँग्रेस छेडणार आंदोलन

⚡मालवण ता.२१-: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इतर भारच्या नावाखाली नागरिकांना वाढीव बिल देऊन लूट करत आहे मीटर कट करत आहे. यामुळे विद्युत वितरणाच्या गलथान कारभारा विरोधात दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मालवण देऊळवाडा येथील वीज वितरण कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे माजी जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोना महामारी काळात नागरिकांचे लहान व्यवसाय बंद झाले होते. मालवणच्या पर्यटनावर देखील याचा परिणाम झाला होता. तरीही नागरिकांनी, व्यापारी वर्गाने त्या दरम्यान आलेली विजे बिल भरली होती. शंभर – दोनशे रुपयांचे जरी बिल भरायचं राहून गेलं असल्यास त्यानंतर येणारी बिले अवाच्या सवा अशी हजारात वाढून येत आहेत. त्यामुळे या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस आंदोलन छेडणार आहे, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page