८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल…
सावंतवाडी
तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार आज उघड झाला यामध्ये चोरट्याने देवीच्या मूर्ती मागील पाच किलो वजनाची चांदीची प्रभावळ व फंड पेटीतील रोख पाच हजार रुपये असा 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला याप्रकरणी दिनेश चंद्रकांत सोनुर्लेकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
