बाळू गावडे यांनी मानले बँक व्यवस्थापनाचे आभार
⚡बांदा ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मडुरा शाखा व्यवस्थापकपदाची मागणी बँक व्यवस्थापनाने मान्य करुन श्री. दळवी यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांनी नूतन व्यवस्थापकांचे अभिनंदन केले. जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांचेही त्यांनी आभार मानले.
जिल्हा बँकेच्या मडूरा शाखेचे मॅनेजर सम्राट मुंज यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यानंतर हे पद रिक्त होते. प्रभारी व्यवस्थाकांना फारसे निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने बँकेच्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. कर्ज प्रकरणे अडकून पडली होती. या पार्श्वभूमीवर बाळू गावडे यांनी चेअरमन मनिष दळवी यांची भेट घेऊन शाखेत कायमस्वरूपी मॅनेजर नियुक्त करण्याची मागणी केली होती.
बँक व्यवस्थापनाने बाळू गावडे यांची मागणी मान्य करुन श्री. दळवी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गावडे यांनी नूतन मॅनेजरांचे स्वागत केले. ग्राहकांना जलद सेवा द्यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच आनंद परब, तात्या शेर्लेकर, संतोष जाधव, विलास पावसकर आदी उपस्थित होते.
