सिंहगर्जना गोविंदा पथकाच्या टी शर्टचे अनावरण

⚡बांदा ता.२१-: बांदा येथील सिंहगर्जना गोविंदा पथकाला लायन्स क्लब ऑफ बांदा पुरस्कृत टी शर्ट प्रदान करण्यात आली. लायन्स क्लब अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर व संचालक प्रशांत कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिडम देवस्थान येथे गोविंदा पथकाच्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष जावेद खतीब, मकरंद तोरसकर, सचिव समीर कोलते, खजिनदार नाना सावंत, सह खजिनदार साई काणेकर, दीपक सावंत, साईनाथ धारगळकर, मधुकर देसाई, अक्रम खान, राजाराम सावंत, निलेश मोरजकर, विनेश गवस, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, निलेश देसाई, राकेश केसरकर, सुनील धामापूरकर, निवृत्त पोलीस अधिकारी अशोक सावंत, विलास पावसकर, संदिप बांदेकर, घनश्याम सावंत, जयेश सावंत, पिच्चू कल्याणकर, बाबा गाड आदींसह नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page