न्हावेली येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न

कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत विविध योजनांचा प्रसार

⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ- : न्हावेली येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. यावेळी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत विविध योजनांचा प्रसार करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त न्हावेली गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात हर घर तिरंगा, झेंडावंदन, श्रमदान स्वच्छ्ता मोहीम, किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन, वृक्षारोपण, पर्यावरण शपथ, महिला मेळावा, शेतकरी मेळावा, कोरोना योद्धा्यांचा सत्कार सोहळा, स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन, समूहगीत स्पर्धाआदी कार्यक्रम राबविण्यात आले. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा पार पडला. यावेळी परशुराम गंगावणे, विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट, कुडाळ पिंगुळी यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत योजनांचा प्रसार व प्रसिद्धी करून दिली. यावेळी समुहगान तसेच महिलांच्या विविध स्पर्धा झाल्या. यावेळी न्हावेली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी वर्ग, शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page