⚡कणकवली ता.२१-: कणकवली पोलीस निरीक्षकपदी पुन्हा सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून गेल्या दोन दिवसातील नियुक्तीचा खेळ थांबविला आहे.
या पूर्वी कणकवलीत संतोष परब हल्ल्याचे तपासकाम केलेले सचिन हुंदळेकर यांना कणकवली पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी कणकवली पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे राजेंद्र हुलावले यांची कुडाळ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. कणकवली पोलीस निरीक्षकपदी असलेले राजेंद्र हुलावले हे यापूर्वी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीने त्यांना कणकवलीत पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली होती.
गेले काही दिवस त्यांनी कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार यशस्वीरित्या संभाळला होता. मात्र काल सुरू झालेले हे बदल्यांचे सत्र रात्री उशिरा पर्यंत सूरू होते. कुडाळ पोलीस निरीक्षक पदावरून फुलचंद मेंगडे यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांच्या जागी हुलावले यांना नियुक्ती देण्यात आली.
श्री मेंगडे हे कुडाळ मध्ये हजर झाल्यावर सुमारे तीन ते चार महिने झाले होते. एवढ्या कमी कालावधीत त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने या बदली मागे नेमकी कारणे काय? असा सवाल उपस्थित केला जात होता.
त्या दरम्यान पुन्हा ही बदली रद्द करत मेंगडे यांना वाहतूक शाखा देण्यात आली. तर संतोष परब हल्ल्याचा तपास हाताळलेले व या पूर्वी कणकवलीत पोलीस निरीक्षक पदावर यशस्वीरित्या पदभार सांभाळलेले पोलीस अधिकारी म्हणून सचिन हुंदळेकर यांची कणकवली पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे
