भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन
⚡बांदा ता.२०-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कास ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील 198 ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार, माजी सैनिक सत्कार , गुणवंत विद्यार्थी गुणगौरव करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पूर्ण वर्षभर कास ग्रामपंचायतीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वृक्षारोपण, विविध चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समुह गीत गायन स्पर्धा, जनजागृती फेऱ्या अशा विविध माध्यमातून संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण निर्माण केले होते. प्रत्येक घरी ग्रामपंचायतीच्या वतीने तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
15 ऑगस्ट2022 रोजी ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर सर्व सत्कारमूर्तींचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नं. 1 शाळेच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. प्रचंड उपस्थितीत वाजत गाजत या रॅलीला प्रतिसाद लाभला.
सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे , बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते.
गावातून बदली होऊन गेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कारही मान. सरपंच यांनी करून त्यांचे ऋण व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सरपंच खेमराज उर्फ भाई भाईप यांच्या मार्गदर्शनाखाली कास ग्रामपंचायतीने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पालव सर यांनी तर प्रास्ताविक स्वाती पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला त्यामुळे मान. सरपंच यांनी सर्व ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सर्व शिक्षक या सर्वांचे आभार व्यक्त केले.
फोटो
कास येथे सरपंच खेमराज भाईप यांचा शाल व श्रीफळ घालून सत्कार करताना सहा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे व अन्य
