समुह गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत मारली बाजी
⚡देवगड ता.२०-: जिल्हास्तरीय स्पर्धेतही पंचायत समिती देवगडचा डंका समुह गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव सांगता समारोह निमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तर्फे खुला गटातील समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग नगरी येथील शरद कृषी भवन येथे ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत पंचायत समिती देवगड प्रभाग देवगड व प्रभाग फणस गाव हे दोन संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत पंचायत समिती देवगड प्रभाग देवगड ने मी भारतीय आहे हे गीत सादर करून जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सर्व टीम चे अभिनंदन केले आहे.
स्वराज्य महोत्सवात देवगड तालुक्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवित संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असताना जिल्हा स्तरावरील स्पर्धेत सुद्धा आपला ठसा उमटविताना आपल्या सांघिक भावनेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या समूह गीत गायनामध्ये कनिष्ठ सहाय्यक नितीन कोयंडे , दत्तात्रय घाडी विशेष शिक्षक , शिक्षक विकास जांभवडेकर, दळवी शिक्षक,मधुसूदन घोडे , बाल विकास प्रकल्प अधिकारी अक्षता देसाई, मुख्य सेविका पूजा सावंत, शिक्षिका दिपीका पालकर ,राजश्री मोंडकर , वरीष्ठ सहाय्यक स्वप्नाली तुळसुलकर ,पाणी व स्वच्छता तज्ञ वैशाली मेस्त्री , मुख्यसेविका राखी राणे यांनी भाग घेतला. तर ढोलकी साथ विकास नर ,ढोलक साथ दर्षन घाडी यांनी केली. संघ संयोजक म्हणून प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे यांनी काम पाहिले. तर गाण्याची निवड ,मार्गदर्शन आणि संगीत संयोजन सचिन जाधव यांनी केले.
