चिमुकल्यांनी लुटला गोपाळकाल्याचा आनंद

⚡मालवण ता.२०-; मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील कै. काळे आजींची शिशुविहार बालवाडी मध्ये गोकुळाष्टमी निमित्त चिमुकल्या मुलांनी दहीहंडी फोडत गोपाळकाल्याचा आनंद लुटला. यावेळी मुलांनी राधा व कृष्ण यांच्या साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.

गोकुळाष्टमी व गोपाळकाला उत्सवानिमित्त कै. काळे आजींची शिशुविहार बालवाडी मधील चिमुकल्या मुलांनी कृष्ण व राधा यांचे आकर्षक वेश परिधान केले होते. यावेळी मुलांनी टोपीवाला हायस्कुल मध्ये विराजमान झालेल्या श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन घेत प्रत्येक मुलाने आणलेले खाऊ कृष्णाला प्रसाद म्हणून दाखविण्यात आले. यावेळी शिक्षकांनी मुलांना गोकुळाष्टमी व दहीहंडी विषयी माहिती देत त्याचे महत्व समाजवून सांगितले. यावेळी मुलांनी कृष्णावर आधारित विविध गाणी व भजने म्हणत गौळण नृत्यही केले. तसेच यावेळी वर्गात बांधलेली दहीहंडी चिमुकल्या मुलांनी फोडत गोपाळकाल्याचा आनंद लुटत धमाल मजा मस्ती केली.

You cannot copy content of this page