वैभववाडी संजय शेळके
भारताचे माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी राष्ट्रीय काॕग्रेसच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
वैभववाडी येथील काॕग्रेस कार्यालयात कै.राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी तालुकाध्यक्ष दादामियाॕ पाटणकर, महिला तालुकाध्यक्षा मिनाताई बोडके, वसंत नाटेकर, बाबाजी पांचाळ, शांताराम नेवरेकर, रमेश देवरुखकर, राजेंद्र पाटील, दिलीप रावराणे, श्रेया मुद्रस, दस्तगीर नाचरे, अरुण कोलते आदी काॕग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभववाडीत राष्ट्रीय काँग्रेसकडून राजीव गांधी यांना अभिवादन
