मालवण दि. प्रतिनिधी
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या प्रांगणात बांधलेल्या दोन दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी कालोत्सव साजरा केला
शोर मच गया शोर….आला रे आला गोविंदा आला …यासारख्या गीतांच्या तालावर आज शनिवारी मालवणच्या सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये उत्स्फूर्तपणे ६३ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
महाविद्यालयात दहीहंडी चा उत्सव व्हावा यासाठी पायल शिरपुटे, प्रीती बांदल, तेजल शिरपुटे, पूर्वा कोयंडे, ऋतिकेश सावंत, तेजस शेडगे, पूर्वा वेंगुर्लेकर, सुशील पाताडे, हितेश वायंगणकर, ऋषिकेश सामंत, अर्जुन मालवणकर इत्यादी विद्यार्थ्यानी जिमखाना आणि सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले होते .
