अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात राजीव गांधी जयंती साजरी

मालवण दि प्रतिनिधी
भारतातील संगणक युगाचे जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय काँगेसचे नेते अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ येथील कार्यालयात सदभावना दिन साजरा करण्यात आला

प्रारंभी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण व ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
यावेळी अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी , सेवादलचे श्रीकृष्ण तळवडेकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, विधानसभा युवक उपाध्यक्ष पल्लवी तारी- खानोलकर, श्रेयस माणगांवकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, श्रीहरी खवणेकर, नागेश मोंडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी राजीव गांधी यांच्या जीवनावर कु. हर्षाली पाडगावकर व कु.चिन्मय तळगावकर यांनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या कार्याची माहिती देणारे भाषण केले

You cannot copy content of this page