⚡सावंतवाडी ता.१९- : कोकण भूषण ज्येष्ठ साहित्यिक कै. कविवर्य विद्याधर भागवत यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर, व कोमसाप शाखा- सारंताडी या संस्थांच्या मदतीने दरवर्षी सिंधुदुर्ग, गोवा विभाग मर्यादित शहरात ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा’ घेण्यात येते. ही स्पर्धा या वर्षी रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२२ सकाळी १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या कवींनी आपली स्वरचित कविता सादर करावी. विजेत्या पाच कवींना प्रथम प्रशस्तीपत्रक व रोख पाचशे रुपये, द्वितीय तीनशे रुपये, तृतीय दोनशे रुपये, उत्तेजनार्थ दोन कवींना शंभर रुपये, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत कवयित्री उषा परब (९४२३८१८८२८) संपर्क करावा व नाव नोंदणी करावी, असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक वरील तिन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवोदित कवींनी सहभागी व्हावे, असे आवाहन, डॉ. जी. ए. बुवा. भरत गावडे, प्रभाकर भागवत, कविवर्य विठ्ठल कदम, अॅड. संतोष सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख भरत गावडे यांच्याशी संपर्क साधावा.
कविवर्य विद्याधर भागवत स्मृती कायवाचन स्पर्धा २८ ऑगस्टला
सावंतवाडीत रंगणार
