आचरे येथील यशराज प्रेरणा संस्थेच्यावतीने खास महिलांसाठी ‘आचरा कुकिंग क्वीन ‘ पाककला स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१९-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि श्रावण मास याचे औचित्य साधून यशराज प्रेरणा आचरायांच्यावतीने यशवंत मंगल कार्यालय .आचरा भंडारवाडी. येथे रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता आचरा कुकींग क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार असून त्यासोबत आकर्षक बक्षिसे देण्यात येतील या स्पर्धेसाठी घटक पदार्थ तांदूळ व नारळ असून पदार्थ शाकाहारी असावा. तांदूळ व नारळ या दोन्ही घटकांचा मुख्यत्वे वापर असणे गरजेचे आहे. पदार्थ सजावटीसाठी तिरंग्याचा रंग असावा व त्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी अर्धा तास देण्यात येईल. त्या पदार्थाची कृती सोबत लिहून आणावी व त्याठिकाणी सादर करावी. पदार्थाचे परीक्षण त्याच्या चव , पौष्टिकता आणि सुयोग्य सादरीकरण यांच्यानुसार केले जाईल.

या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या २५ स्पर्धकांना संधी दिली जाईल. स्पर्धेसाठी भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी मिनल कोदे ९४२२९०१७३८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page