⚡मालवण ता.१९-: राज्यात हापूस आंब्याचे तीन वेळा प्रथम उत्पादन घेऊन बाजारपेठेत पाठविल्याबद्दल मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील ऍग्रो आयडॉल पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरविण्यात आले
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यावतीने बेळगाव येथे लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलनात विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सात व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील ऍग्रो आयडॉल पुरस्कार मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
राज्यात हापूस आंब्याचे तीन वेळा प्रथम उत्पादन घेऊन बाजारपेठेत पाठविल्याबद्दल उत्तम फोंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेळघाट अमरावती येथील पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि कर्नाटकचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांच्या हस्ते फोंडेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, मानपत्र, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फोंडेकर यांना यापूर्वी गोवा सरकार व कोल्हापूर येथेही पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी उत्तम फोंडेकर यांचे कौतुक केले आहे ऍग्रो आयडॉल पुरस्कार मिळवून फोंडेकर यांनी सिंधुदुर्ग व महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे, असे कौतुकोद्गार काढत ना. केसरकर यांनी फोंडेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
