बांदा ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप

बांदा /प्रतिनिधी
. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बांदा शहर ग्रामपंचायतच्या वतीने विविध गटात घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये तरुणांबरोबरच खुल्या गटात ज्येष्ठानीही सहभाग घेतला. बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा येथे आयोजित समारोप कार्यक्रमात गेल्या ८ दिवसात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
. मॅरेथॉन स्पर्धेत पाचवी ते सातवी गट (पुरुष ) शुभम रामबाहादूर मोर्या (खेमराज हायस्कुल, बांदा ), सुनील बाबुराव जंगले (केसरी), अथर्व प्रसाद चिंदरकर (खेमराज हायस्कुल, बांदा ), सुदर्शन सखाराम नेमण (खेमराज हायस्कुल ) यांनी प्रथम चार क्रमांक मिळविले. महिला गटात अक्षरा अनंत पाटील (जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १), उस्मा अक्रम खान (दिव्य ज्योती स्कुल, बांदा ), जोया युसूफ मीर (दिव्य ज्योती स्कुल, बांदा) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले.
आठवी ते दहावी गट (मुले )- दत्ताराम संतोष परब (खेमराज हायस्कुल बांदा ), प्रणव सुदान वाळके (खेमराज हायस्कुल बांदा ), आयान मलिक (व्ही. एन. नाबर स्कुल, बांदा) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. मुलींच्या गटात तनुष्का राजेश शिंदे (खेमराज हायस्कुल, बांदा ), सोनाली रवींद्र गावकर (व्ही. एन. नाबर स्कुल, बांदा), अनुष्का अविनाश पंडित (व्ही. एन. नाबर स्कुल बांदा ) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले.
खुला गट (पुरुष )- फ्रेकी तमास गोम (करिवडे), अर्जुन अशोक बंदिवडेकर (बांदा), प्रकाश तुकाराम जंगले (केसरी) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. महिलांच्या गटात रसिका बाळकृष्ण परब (पारपोली), उमांगी उमेश मयेकर (बांदा), प्रियांका परशुराम नाईक (बांदा) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले.
बांदा शहराच्या इतिहासावर ऑनलाईन घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक -निकिता येडवे व अर्चना सावंत, द्वितीय क्रमांक -अक्षय मयेकर व दिव्या गावडे, तृतीय क्रमांक -रिना मोरजकर, चतुर्थ क्रमांक- स्वाती पाटील, पाचवा क्रमांक- सुहास सावंत यांनी यश मिळविले.
. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बांदा शहरात विविध उपक्रम तसेच स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धाच्या पारितोषिकांचे वितरण ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीना मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, बाळू सावंत, राजेश विरनोडकर, सदस्या उमांगी मयेकर, किशोरी बांदेकर, रिया आमलेडा, स्वप्नाली पवार, केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बांदा शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत गायन, व समूहनृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे डी पाटील यांनी केले. आभार साई काणेकर यांनी मानले.
फोटो :-
बांदा केंद्रशाळेत पारितोषिकांचे वितरण करताना मान्यवर.

You cannot copy content of this page