राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा कणकवलीत इशारा
⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्गात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा अनेकांनी निर्णय घेतला आहे.येत्या आठ- दहा दिवसात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा येणार आहे. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणजे आमच्या खऱ्या शिवसेनेची सिंधुदुर्गात ताकद काय आहे हे दाखवून देणार आहे असा सूचक इशारा राज्याचे उद्योग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नाम. उदय सामंत यांनी दिला आहे.
कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याचे उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांचे शिंदे समर्थक शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेल्या उदय सामंत यांच्या स्वागता प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, शेखर राणे, अतुल दळवी, दामू सावंत,सतीश हरमलकर, बाबू आचरेकर, सुनील पारकर, नाना सापळे,राजू कासले, दीपक राऊत,किसन मांजरेकर,बाळू पारकर,अमित केतकर, चिन्मय राणे,अनिल खोचरे ,यांच्यासह अनेक शिंदे समर्थक शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाम.उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीत जात असताना सिंधुदुर्ग ठीक ठिकाणी जोरदार समर्थन असल्याचे दिसून आले काहीजण आज आले नसले तरी भविष्यात ते आमच्या सोबत असतील असे नाम. सामंत म्हणाले.
