ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश…

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती…

⚡सावंतवाडी ता.१९-: गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने ग्रामीण भागातील समस्या दूर होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी ते रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून, तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली. तसेच तालुक्यातील आबोली, गेळे, चौकुळं मधील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केले जाणार असून, प्रश्न कोण सोडवतो ते महत्वाचे नसून, प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page