भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपस्थिती
⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस संजू परब यांच्या कार्यालयासमोर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी विशाल परब, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग, चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शर्वाणी गांवकर, शेखर गांवकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, दत्तू नार्वेकर, अजय सावंत, सत्यजित धारणकर, सुरेश गावडे, भुपेंद्र सावंत, महेश धुरी, उमा वारंग, चंदन धुरी, हनुमंत पेडणेकर, विनोद सावंत, अक्रम खान, जावेद खतीब, मकरंद तोरसकर, अँड अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.
