सावंतवाडीचे कार्यसम्राट नेतृत्व – संजू परब

⚡सावंतवाडी ता.१९-: संजू परब हे सावंतवाडी मतदारसंघातील आमदारकीचे प्रबळ दावेदार आहेत. यामुळेच त्यांनी सिंधुदुर्गातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे, त्यांचा आज वाढदिवस, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्यामाध्यमातून त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धावता आढावा

दानशुरपणा हा संजूचा महत्वाचा गुण. या गुणामुळे आज संजू हा जनतेच्या मनातील आमदार बनला आहे हे विशेष. संजू परब यांचा शाखाप्रमुख, युवक काँग्रेसचा पदाधिकारी ते नगराध्यक्ष हा एक थक्क करणाराच प्रवास आहे. मडूरा सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचे शिक्षण, व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले.

मुळापासून नेत्रुत्वाचे गुण असणारा हा कार्यकर्ता माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय उद्योगमंत्री यांच्या संपर्कात आला. शिवसेनेतून राणे साहेबांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच संजूने देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्या नेत्रुत्वाला खरा परिसस्पर्श झाला तो २००९ च्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निलेशजी राणे यांचा. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर संजू देखील या निवडणुकीत निलेशजींना विजयी करून खासदार म्हणून दिल्लीला पाठवण्यात खारीचा वाटा उचलला, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोखसभा सरचिटणीस, अध्यक्ष अशी पदे देखील त्यावेळी संजूने भुषवली.

२०१४ मध्ये राणे साहेबांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून संजूची घोषणा केल्यानंतर त्याने झपाटल्यागत पूर्ण तालुका पिंजून काढला. गावोगावी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र करण्यास सुरवात केली.

१७-० असे मागे असलेल्या सावंतवाडी नगरपरिषद मध्ये आपली काही डाळच शिजणार नाही असा सर्वांचा समज होता. मात्र नारायणराव राणे साहेब व निलेशजीच्या मार्गदर्शनाखाली संजूने अक्षरशः कमाल केली. सावंतवाडी नगरपरिषदमध्ये सर्वाधीक ८ नगरसेवक संजू परब यांच्या तालुकाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत मेहनत करून निवडून आणले. दिपक केसरकरांच्या सावंतवाडीतील साम्राज्याला तेव्हापासूनच तडे जायला सुरूवात झाली. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ५ तर पंचायत समितीच्या १८ पैकी ११ जागा काँग्रेस च्या निवडून आल्या त्यात सर्वात मोठा वाटा हा तालुकाध्यक्ष संजू परब यांचाच होता. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८०% ग्रामपंचायती निवडून आणून त्याने सर्व विरोधकांना तोंडात बोटे घालायला लावली.

२०१९ मध्ये त्याने राणे साहेबांबरोबरच भाजपमध्ये प्रवेश केला. राणे साहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यावेळी देखील काही ग्रामपंचायत निवडणूका लागल्या होत्या, मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील ८०% ग्रामपंचायती निवडून आणत त्याने दादांना भेट दिली,

भाजपा पक्षात आल्यानंतर देखील संजूने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्यावर पडलेली जबाबदारी अगदी विश्वासाने पार पडली. त्यानंतर झालेल्या बांदा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत अक्रम खान याला निवडून आणण्यात संजुचा महत्त्वाचा वाटा होता.

त्यानंतर लागली ती सावंतवाडी नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणुक. यात संजू परब यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भाजपाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत केंद्रीय उद्योग मंत्री नारायणराव राणे साहेब, माजी खासदार निलेशजी राणे साहेब, माजी मंत्री रविंद्र चव्हाण साहेब, आमदार नितेश राणे साहेब, जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने संजूने या निवडणुकीत विरोधी उमेदवारावर मात करत नगराध्यक्ष पद मिळवले.
त्यानंतर संजूला भाजपा जिल्हा प्रवक्ते हे पद मिळाले. आतापर्यंतच्या या प्रवासात त्याची सुविज्ञ पत्नी मिनल, दोन्ही मुली वैष्णवी, सई, त्याची आई व दिवंगत वडिल यांची समर्थपणे साथ लाभली.

गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत संजूने आपल्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता फिल्डवर उतरून अनेकांना मदत केली.

You cannot copy content of this page