मैत्री पहिली, नंतर राजकारण

पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला संजू परब यांचे गौरवोद्गार

⚡सावंतवाडी ता.१८-: पुंडलिक दळवी हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असले तरी ते पूर्वीपासून माझे चांगले आणि जवळचे मित्र आहेत. आम्ही आमची मैत्री राजकारणापलीकडे जाऊन जपली आहे. असे उद्गार भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमांत बोलताना काढले आहेत.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात काम करत असताना अनेकवेळा आम्हाला एकमेकांवर टीका करावी लागते. परंतु, आम्ही दोघांनी देखील ती टीका हसतमुखाने स्वीकारली, राजकारणात कधीही मैत्री आणली नाही. तसेच मैत्रीत राजकारण केले नाही. असे देखील ते यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page