गर्दी जमविण्यासाठी मंत्री केसरकर यांनी आयोजित केला नागरी सत्कार…

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा केसरकरांना टोला

⚡सावंतवाडी ता.१८-: गर्दी जमविण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांना आपला नागरी सत्कार करण्याची वेळ आली असा जोरदार टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. मात्र शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या केसरकरांच्या नागरी सत्काराला मात्र स्टेजवर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. असा चिमटा देखील त्यांनी यावेळी काढला.

यावेळी बोलताना भोसले म्हणाले की आगामी काळात होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे. यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, अशी भूमिका राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे मांडली.

You cannot copy content of this page