संजू परब यांच्या वाढदिनी उद्या कार्यक्रमाचे आयोजन

भाजप कार्यकर्ते, संजू प्रेमींनी उपस्थित राहावे;शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आनंद नेवगी यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.१८-: येथील जिल्हा भाजप प्रवक्ते तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष श्री संजू परब यांचा वाढदिवस उद्या दि.१९ ऑगस्ट रोजी होत आहे. यानिमित्त येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाकडे सकाळी १०:३० वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते मित्र मंडळी व संजू भाई प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे व माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी केले आहे

श्री. परब यांचा वाढदिवस उद्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप तसेच सविता आश्रम येथील धान्य वाटप करून असे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांच्या संपर्क कार्यालयाकडे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते मित्रमंडळी व संजू भाई प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अजय गोंदावळे व आनंद नेवगी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page