हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण

सावंतवाडी : प्रतिनिधी
हातभार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतनी काल मंगळवारी मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.आपली अर्थव्यवस्था चालवण्यात कृषी क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. सद्यस्थितीत वाढते प्रदूषण पहाता प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावणे आवश्यक आहे.. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असल्याने जनमानसात जागृती व्हावी या उद्धेशाने तसेच आपण सुद्धा या कार्यात हातभार लावावा या उद्देशाने हातभार चॅरिटेबल ट्रष्ट च्या वतीने अमृतमोहत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हे वृक्षारोपण करण्यात आल्याचे संस्थेचे संस्थापकअध्यक्ष शैलेश मयेकर यांनी सांगितले.
यावेळी हातभार चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापकअध्यक्ष शैलेश मयेकर, संस्थापक खजिनदार नयनेश गावडे, स. सचिव एकनाथ चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे,जि. सचिव शामसुंदर सावंत,जि. महिला सचिव अस्मिता भराडी, महिला तालुकाध्यक्ष नेहा काष्टे, म.ता.खजिनदार सायली देवरुखकर,म.सदस्य वैशाली साबळे,कु अनिकेत भराडी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page