१९ रोजी अनुसया कॉम्प्लेक्समध्ये दहीहंडी आयोजन

देवगड
इंद्रधनू – देवगड (रजि.) यांच्यावतीने आयोजित व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने देवगड शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स (मांजरेकर नाक्यानजीक ) येथे १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या दहिहंडी उत्सवात प्रथम विजेत्या पथकास ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार असून सलामी देणाऱ्या पथकांसाठीही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती इंद्रधनू संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांनी दिली.

संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दहिहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, सदस्य राजीव पडवळ, भावेश पटेल, आनंद रामाणे, वैभव केळकर, मिलिंद मोर्ये, यतीन कुळकर्णी, दिनेश पटेल, शंकर मुणगेकर, साईनाथ सुके उपस्थित होते. श्री. कुळकर्णी म्हणाले, कोरोनाच्या काळानंतर प्रथमच दहिहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. राज्य शासनानेही या उत्सवावरील कोरोनाविषयक निर्बंध हटविल्याने गोविंदा पथकांचा व रसिकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. हा उत्सव प्रथमच इंद्रधनू संस्थेमार्फत नव्या जोशात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात प्रथम क्रमांकाच्या पथकास ११ हजार १११ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्या पथकास ५ हजार रुपये, सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकास ३ हजार रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकास २ हजार रुपये, तर चार थरांची सलामी देणाऱ्या पथकास एक हजाराचे बक्षिस देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव श्री. वाडेकर (९४२२५८४७१२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुळकर्णी यांनी केले आहे…

You cannot copy content of this page