सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे आयोजित नारळ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
⚡मालवण ता.१७-: मालवणातील सौ शिल्पा यतीन खोत आयोजित सर्वाधिक मोठ्या रक्कमेची पारितोषिके असलेल्या महिलांच्या जिल्हास्तरीय नारळ लढवणे स्पर्धेत प्रियांका लाड यांनी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावीत खास आकर्षण ठरलेला सोन्याने मढवलेल्या नारळावर आपले नाव कोरले या पारितोषिका बरोबर सोन्याची तीन नाणी, पैठणी देऊन लाड यांना सन्मानित करण्यात आले तर उपविजेत्या ठरलेल्या वैदेही जाधव यांना सोन्याची नथ व सोन्याचे नाणे आणि मनीषा जाधव व भारती आचरेकर यांना चांदीचा दिवा देऊन उत्तेजनार्थ म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर श्वेता शेखर तोडणकर या लकी ड्रॉ च्या मानकरी ठरल्या.
नारळी पौर्णिमा निमित्ताने दरवर्षी मालवणात होणारी ही स्पर्धा यावर्षी नारळी पौर्णिमेदिवशी कोसळलेल्या धुवांधार पावसामुळे स्थगित करण्यात आली होती ही स्पर्धा मंगळवारी मालवण भरड येथील दत्त मंदिराच्या प्रागणात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ योग शिक्षिका सौ. जयश्री हडकर यांच्या हस्ते झाले. वृंदा मोरे व स्मृती कांदळगावकर यांच्या हस्ते शुभारंभाचा नारळ लढवून स्पर्धेची सुरवात झाली. या स्पर्धेस मालवणचे आम. वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक देवदत्त हडकर, पद्मजा वझे, परशुराम खोत, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे बाबी जोगी, मंदार केणी, मंदार ओरसकर, महेश जावकर, नितीन वाळके, किरण वाळके, भाई कासवकर, नरेश हुले, सिद्धू जाधव, मनोज मोंडकर, अमेय देसाई, उमेश मांजरेकर, प्रकाश करंगुटकर, बंड्या सरमळकर, सेजल परब, शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, अंजना सामंत, दीपा शिंदे, नंदा सारंग, चारुशीला आढाव, स्मृती कांदळगावकर, वृंदा मोरे, रूपा कुडाळकर, माजी सभापती सोनाली कोदे, महानंदा खानोलकर, माई चिंदरकर, लायन्स क्लब अध्यक्ष वैशाली शंकरदास, अनुष्का चव्हाण, अंजली आचरेकर, पूजा वेरलकर, स्वाती तांडेल, अश्विनी आचरेकर, कृपा कोरगावकर, प्राजक्ता गांगनाईक, पूजा तळाशीलकर, अक्षय भोसले शेखर मुणगेकर आदींसह विविध मान्यवर, स्वराज्य ढोल पथक सर्व सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेच्या निमित्ताने आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. गार्गी ओरसकर, मच्छी विक्रेत्या महिला प्रतिनिधी सौ. मनीषा जाधव, शिक्षिका सौ. श्वेता यादव, शिक्षिका सौ. शुभांगी खोत या पाच जणांचा डॉ. मालविका झांटये, डॉ. शिल्पा झांटये, महाविद्यालय प्राचार्य डॉ. उज्वला सामंत, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धे दरम्यान भरड येथील बाल चमुनी सामाजिक संदेश देणारे पथनाट्य सादर केले. तर अहाना तळाशीलकर हीच नृत्याविष्कार सादर झाला. तर तुषार म्हापणकर यांचा कोंबडा व तात्या विंचू नृत्य आकर्षक ठरले. तसेच वालावल येथील तत्परा चौधरी व सोहम चौधरी यांचे सोलो ढोल ताशा वादन लक्षवेधी ठरले. दत्तमंदिर मंडळाच्या सहकार्यातून स्पर्धा यशस्वी झाली. या स्पर्धेला महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीचे विशेष कौतुक केले. नारळ लढविणे स्पर्धेच्या माध्यमातून शिल्पा खोत यांनी महिलांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले, असे कौतुकोद्गार आम.वैभव नाईक यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नितीन तोडणकर, प्रवीण रेवंडकर, सायली कांबळी, रूपा कुडाळकर, पूजा तळाशिलकर, प्रतिभा चव्हाण, अमेय देसाई, मंदार ओरसकर, करण खडपे यांनी काम पाहिले. सर्व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याचे सांगत शिल्पा खोत यांनी सर्वांचे आभार मानले.
