⚡मालवण ता.१३-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगर परिषदेच्या वतीने आज मामा वरेरकर नाट्यगृहात देशभक्तीपर मी भारतीय या नाटकाचे तसेच शहरातील स्थानिक कलाकारांच्या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अमृतमहोत्सवानिमित्त मालवण नगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.
मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले व चालू असलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांना दिली.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मालवण नगरपालिकेचे कौतुक केले. मालवण नगरपालिकेची इको ब्रिक्स स्पर्धा, समुद्रावरील स्वच्छता मोहीम यांची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली. यावेळी मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे आणि तहसीलदार अजय पाटणे, शहर समन्वयक निखिल नाईक आदी व इतर उपस्थित होते.
