कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे बांदा येथे जंगी स्वागत…

मंत्री केसरकर समर्थकांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील केले पुषगुच देऊन स्वागत

⚡बांदा ता.१३-: महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शप्पत घेतल्यानंतर जिल्ह्यात प्रथम आलेल्या मंत्री दीपकभाई केसरकर यांचे बांदा शहरात जंगी स्वागत करण्यात आले. बांदा येथे आगमन होताच गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ढोलताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व कार्यकर्त्यानी दिलेल्या गगनचुंबी घोषणांनी परिसर दणाणून गेले.यावेळी शिंदेगटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे व बांदा शहर कार्यकर्त्यांनी मंत्री केसरकर यांचे पुष्पहार घालत स्वागत केले.

यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मंत्री केसरकर यांचे स्वागत केले.
कॅबिनेट मंत्री पदाची शप्पत घेतल्या नंतर बांदा शहरात प्रथमच आगमन झालेल्या मंत्री केसरकर यांच्या स्वागतासाठी सायंकाळी चार पासूनच मोठी गर्दी केली होती. नियोजित वेळेच्या तासभर उशीर होऊन सुद्धा दीपकभाई प्रेमी कार्यकर्ते कट्टा कॉर्नर येथून हलले नाहीत. स्वागतासाठी ढोलपथक सुद्धा मागविण्यात आले होते. मंत्री केसरकर यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी गगनचुंबी घोषणा दिल्या. हमारा नेता कैसा हो दीपकभाई जैसा हो, दीपकभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिंदे गटाचे सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, दीपकभाईप्रेमी संदेश पावसकर, सिंधुदुर्ग जिल्हा स्वामिल संघटचे उपाध्यक्ष आनंद गवस, ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, कास सरपंच खेमराज भाईप, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरंगावकर, अर्चना पांगम माजी सभापती शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सिद्धेश पावसकर, बाबा काणेकर, जगदेव गवस, भाऊ वाळके, प्रसाद पावसकर, दादा येडवे, साई करमलकर, भैय्या गोवेकर, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके,अनुप पावसकर, सुनील धामापूरकर, केदार कंणबर्गी,सुनील राऊळ आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page