भारतामध्ये हुशारी आहे ती विद्यार्थांनी टिकून ठेवणे गरजेचे

अनिल परळेकर;कळसुलकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ- : भारतीयांचा मेंदू हा परदेशातील लोकांना हवा आहे. हुशारी आपल्या भारतामध्ये आहे. ती तुम्ही विद्यार्थांनी टिकून ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हुशारीचा वापर देशालाच झाला पाहिजे, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी अनिल परळेकर यांनी केले.
कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे विद्यार्थी वार्षिक गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परुळेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेची माजी अध्यक्ष रमेश पई, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, संस्था सचिव प्रसाद नार्वेकर, सदस्य गौरांग चिटणीस, प्रशालेचे मुख्याध्यापक एन.पी. मानकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत तसेच पालक- शिक्षक संघ,शाळा व्यवस्थापन समितिचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पहिली ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्याना तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेकडे अनेक दानशूर व्यक्तींनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजाच्या रक्कमेतून बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे माजी अध्यक्ष श्री रमेश पई यांनी आपल्या गावाला, आपल्या शाळेला विसरू नका. आपल्या गावाचे शाळेचे नाव मोठे करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. तर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शैलेश पई यांनी विद्यार्थ्यांना शाळेचा नावलौकिक उज्वल करा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.पी. मानकर, सूत्रसंचालन एस. यु. बांदेलकर यांनी तर आभार एस. व्ही. भुरे यांनी मानले.

You cannot copy content of this page