Headlines

आस्था ग्रुपच्यावतीने आयोजित समुहगीत स्पर्धा संपन्न…

शालेय गटात वराडकर हायस्कूल तर महाविद्यालयीन गटात स.का.पाटील ने पटकावला प्रथम क्रमांक..

मालवण दि प्रतिनिधी
स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आस्था ग्रुपच्यावतीने आयोजीत केलेल्या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत शालेय गटात कट्टा येथील वराडकर हायस्कूलने तर महाविद्यालयीन गटात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणने प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत शालेय गटात प्राथमिक कन्याशाळा (द्वितीय), ओझर विद्यामंदिर कांदळगाव (तृतीय), टोपीवाला हायस्कूल (उत्तेजनार्थ) क्रमांक प्राप्त केले. महाविद्यालयीन गटात वराडकर हायस्कूल ज्युनियर कॉलेज यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी संघाना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास तहसीलदार अजय पाटणे, आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, परीक्षक मेघना जोशी, संजय शिंदे, प्राथमिक रेवतळे शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी देशमुख, सहाय्यक शिक्षिका सौ. गवस, सौगंधराज बादेकर, हरी चव्हाण, मनोज चव्हाण, बंटी केनवडेकर, भाऊ सामंत, प्रशांत हिंदळेकर, मिथीलेश मिठबावकर, आगोस्तीन डिसोझा, कुणाल मांजरेकर, संग्राम कासले, अमित खोत, कृष्णा ढोलम, ललित चव्हाण, महेश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. जोशी यांनी ज्यानी सादरीकरण प्रभावी केले त्यांना क्रमांक प्राप्त झाला आहे. परंतु सहभागी स्पर्धकांनी निराश होऊ नये. स्पर्धेमध्ये क्रमांक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सहभागी होऊन कला सादर करणे देखील महत्त्वाचे आहे असे सांगितले तर तहसीलदार अजय पाटणे यांनी आस्था ग्रुपने कोविड कालावधीत गरजू नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांना अन्नदानाची सोय केली होती. आस्था ग्रुपचे कार्य कौतुकास्पद होते. समूहगीतच्या स्पर्धा आयोजीत करून विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम आस्था ग्रुप करीत असल्याचे सांगितले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरी चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन संग्राम कासले, सौगंधराज बांदेकर यांनी केले. उमेश मांजरेकर यांनी आभार मानले.

फोटो ओळी- येथील आस्था ग्रुपच्या वतीने आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत शालेय गटातील विजेत्या कट्टा येथील वराडकर हायस्कुल च्या विद्यार्थ्यांना तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

छाया गणेश गावकर

You cannot copy content of this page