पतंजली योग समितीकडून ७५ सूर्यनमस्कार घालून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा…

बांदा /प्रतिनिधी
पतंजली योग समिती बांदा तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी पतंजली योग वर्गात 75 सूर्यनमस्कार पूर्ण करुन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रमात आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ५.३० वाजता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास बांदा शहरातील सर्व नागरिक, सर्व योगाभ्यास प्रेमी साधकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पतंजली योग समिती बांदा तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर मो. 9823881712, संजय नाईक, मो. 9422379174 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page