आमदार दीपक केसरकर यांचे सावंतवाडीत जोरदार शक्तिप्रदर्शन…

विरोधकांना दिले प्रतिउत्तर; शहरात ठीक ठिकाणी जंगी स्वागत…

सावंतवाडी ता.१३-:

शिंदे गटाचे प्रवक्ते तथा सावंतवाडीचे आमदार कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे सिंधुदुर्गात सर्वत्र जल्लोषी स्वागत करण्यात आले असून, सावंतवाडीत नाक्या नाक्यावर त्यांचा ताफा थांबवून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. सावंतवाडीत येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन दाखवा, तुमच्या सोबत किती जण आहेत हे समजेल असे आवाहन करत असलेल्या विरोधकांना त्यांनी न बोलताच आमदार दीपक केसरकर यांच्या समर्थकांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर यांची भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी हिंदू बांधवांसह, मुस्लिम आणि खिश्चन बांधवांनी देखील आमदार दीपक केसरकर यांचे जंगी स्वागत केले आहे. यावेळी “दीपक भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे…!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सावंतवाडी मध्ये सर्वत्र झालेल्या जल्लोषी स्वागतावरूनच आमदार दीपक केसरकर आणि सावंतवाडीकर यांच्यातील दृढ नात आमदार दीपक केसरकर यांच्यावर सावंतवाडीतील जनतेचा विश्वास दाखवून दिला आहे.

You cannot copy content of this page