कणकवलीत उदया भाजपची भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली

आम. नितेश राणे नेतृत्व करणार

⚡कणकवली ता.१३-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने कणकवली शहरात भाजपाच्यावतीने १४ ऑगस्टला मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. कणकवली शहरातून १० वाजता ही रॅली निघणार असून, आमदार नितेश राणे या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.
कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली निघणार आहे. या रॅलीत कणकवली तालुक्यातील रिक्षा देखील सहभागी होणार आहेत. ही रॅली यशस्वी करण्याच्या दृष्टीने आज कणकवली नगरपंचायत मध्ये आमदार नितेश राणे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक ॲड. विराज भोसले, बाबू गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, गणेश तळगावकर, राजा पाटकर, नितीन पडावे, पप्पू पुजारे, किशोर राणे, व्यंकटेश सावंत, राजू गवाणकर, सागर राणे आदि उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात होणार असून, प्रत्येक दुचाकीस्वारा जवळ तिरंगा झेंडा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून कणकवली पटवर्धन चौक येथून ही रॅली बाजारपेठ मार्गे पटकी देवी येथून छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणाहून नरडवे रोडवरून तहसीलदार कार्यालया जवळ येणार आहे. तहसीलदार कार्यालय जवळ साकारण्यात आलेल्या लाल किल्ल्याच्या प्रतिकृती जवळ या मोटरसायकल रॅलीचा सेल्फी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा ध्वज स्तंभ कणकवलीत उभारण्यात आला असून या ठिकाणी भाजपाची ही मोटरसायकल रॅली भेट देणार आहे. या रॅलीत सहभागी व्हा, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page