सैनिक पतसंस्था म्हापण व माजी सैनिकांचा उपक्रम
कुडाळ :सैनिक पतसंस्था शाखा म्हापण व पंचक्रोशीतील माजी सैनिकांच्या च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमोहोत्सवाचे औचित्य साधत म्हापण जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या वेळी माजी सैनिक व शाखा अध्यक्ष मा. यशवंत कोचरेकर, सैनिक पदसंस्था शाखा म्हापणचे मॅनेजर सहदेव प्रभू , गुरुनाथ ठाकूर, राजेंद्र म्हापणकर, कर्मचारी सौ सविता पाटकर, अनिकेत पाटकर, भिवा गावडे, विनायक गावडे तसेच मुख्याध्यापक उल्लास मेतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक वाघमारे यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सहशिक्षिका चव्हाण आभारप्रदर्शने सर्वांचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
