डॉ बाळकृष्ण गावडे
वैभववाडी संजय शेळके
रानभाज्या या आरोग्यपूर्ण संतुलित आहाराचा एक अविभाज्य भाग आहे म्हणून उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते उपलब्ध साधन संपत्ती याचा विचार करता रानभाज्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. जंगलात उपलब्ध असलेल्या रानभाज्याची काढणी व संकलन त्यांच्या श्वासात स्वरूपाच्या विकासांतर्गत शास्त्रीय पद्धतीने पण मर्यादित स्वरूपात करावी असे आव्हान डॉ बाळकृष्ण गावडे यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या आमृतमहोत्सवाअंतर्गत तालुकास्तरीय तालुका कृषी व आत्मा समितीच्या यांच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे करण्यात आले होते.
यावेळी नायब तहसीलदार कासकर मॅडम गटविकास अधिकारी जयप्रकाश परब तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, कृषी पर्यवेक्षक एकनाथ गुरव, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे, कृषी पर्यवेक्षक योगेश देशमाने, आत्म समितीचे सदस्य महेश रावराणे, उत्तम सुतार, आत्मा सचिव राकेश हुले, कृषी सहाय्यक प्रकाश लाबोर, दिपक मसेकर,मानिक शिंदे,नाजूका फावडे, आदी पदाधिकारी कृषी सहाय्यक, शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ गावडे म्हणाले वनस्पती आणि मानवाचं दृढ असं नातं आहे मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर वनौषधी व आरोग्यदायी पर्यावरण या मूलभूत गरजा संपूर्णपणे वनस्पतींच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात.
यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नायब तहसीलदार कासकर मॅडम, आत्म सदस्य महेश रावराणे, शेतकरी महेश पवार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रावराणे विद्यालयचे शिक्षक तुळसणकर तर आभार कृषी सहाय्यक प्रकाश लाबोर यांनी मानले
फोटो रानभाज्या महोत्सवाचे पाहणी करताना गटविकास अधिकारी परब नायब तहसीलदार कासकर मॅडम कृषी अधिकारी कांबळे आधी उपस्थित. छाया संजय शेळके वैभववाडी
