⚡सावंतवाडी ता.सहदेव राऊळ : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दोन दिवसीय सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह गुरुवार ११ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.
या हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, श्री देव रवळनाथ देवावर अभिषेक, होमहवन, मंत्रपठण, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच सकाळपासून मळगाव येथील सावळवाडा, पाडगावकरवाडी, वरची देऊळवाडी, सुतारवाडी, खालची देऊळवाडी, कुंभारवाडी, तेलकाटावाडी, तेलीवाडी, कुडववाडी, जोशी मांजरेकरवाडी, नाईकवाडी, बांदेकरवाडी, कुंभारआळी आदी स्थानिक भजनमंडळांची ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे भजने होणार आहेत. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी महाप्रसादाने सांगता होणार आहे. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे
