खर्डेकर महाविद्यालयात सामुदायिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी – भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेक महाविद्यालयातील पटांगणावर सामुदायिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शहरात मोटरसायकल तिरंगा रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने वेंगुर्लावसीय सहभागी झाले होते.

  महाविद्यालयात पार पडलेल्या सामुदायीक राष्ट्रगीत कार्यक्रमात प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, डॉ.पूजा कर्पे, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, विधाता सावंत, शितल आंगचेकर, कृपा गिरप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल, सामाजिक कार्यकर्ते रमेश नार्वेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल रेडकर, इनरव्हीलच्या अध्यक्षा स्मिता दामले, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, अॅड.जी.जी.टांककर, सुरेंद्र खामकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, अॅड.सुषमा खानोलकर, बाबली वायंगणकर, जया वायंगणकर, किशोर सोन्सुरकर, प्रा.आनंद बांदेकर, साईप्रसाद नाईक, सुरेंद्र चव्हाण, शिवानी आळवे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपरिषदचे कर्मचारी, खर्डेकर महाविद्यालयाचे एन.एस.एस., एन.सी.सी., आजीवन आय.एन.व विस्तार विभाग तसेच इतर विद्यार्थी प्राचार्य एम.आर.देसाई मेडियम स्कूल, होमिओपॅथीक कॉलेज, पाटकर हायस्कूल, एन.सी.सी.विद्यार्थी व वेंगुर्ल्यातील नागरिक सहभागी झाले होते.

  सामुदायीक राष्ट्रगीत गायनानंतर तिरंगा दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली खर्डेकर महाविद्यालयापासून वेंगुर्ला मार्केट, जूना एस.टी.स्टॅण्ड मार्गे पिराचा दर्गा, बॅ.नाथ पै मार्ग, कॅम्पपर्यंत रॅली काढून शहरात अमृत महोत्सवाची जनजागृती करण्यात आली.
You cannot copy content of this page