राणेंना मंत्री केल्याने उद्धव ठाकरे झाले नाराज

नाहीतर मुख्यमंत्री पदाचा देणार होते राजीनामा;शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी पंतप्रधान व उद्धव ठाकरे भेट झाल्याचे केले उघड

⚡मुंबई दि.०५-: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली. यात नारायण राणेंचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावरही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितलं होतं, असा खुलासा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले पंतप्रधान मोदींनी प्रतिसादही दिला. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. नंतर त्यांची भेटही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते. परंतु नंतर 12 आमदारांचं निलंबन झालं. यानंतर राणेंना केंद्रात घेतलं गेलं. यामुळं उद्धव ठाकरे नाराज झाले. ही गोष्ट दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरेही होत्या, असा खुलासा केसरकरांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हासाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे गट न्यायालयीन लढाई लढत आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आता सोमवारी सुनावणी होणार आहे. यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हेही या निकालावरून समजेल, असं केसरकर म्हणाले.

You cannot copy content of this page