भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली भूमिका

⚡कणकवली ता.०५-: राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गट हे एकत्र येत स्थापन झालेले सरकार हे हिंदुत्व च्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी चे आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. मात्र भाजपाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये. याबाबत योग्य वेळी योग्य तो पक्षाकडून निर्णय घेतला जाईल अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page