⚡सावंतवाडी ता. ०१-: येथील टॅक्सी चालक हनुमंत बाळकृष्ण माळवदे (३८) यांचे गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती.
माळोदे हे सावंतवाडी टॅक्सी स्टैंडवर कार भाड्याने देण्याचा ते व्यवसाय करत होते. त्यांना गेले काही दिवस मधुमेहाचा त्रास होता. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे अधिक उपचार सुरू होते. मात्र काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. टारझन उर्फ संतोष यांचे ते भाऊ होत.
