⚡वेंगुर्ले ता.०१-: वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज श्रावण सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.शहरासह तालुक्यातील गावातील मंदिरांमध्ये विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.
वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज सकाळपासून पूजा, अभिषेक, लघुरुद्र तसेच श्रावण महिन्यातील खास आकर्षण असलेल्या १११ वरदशंकर पूजा संपन्न झाल्या.यावेळी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.रात्री पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली.
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व गुरुवारी भाविकांच्या सहकार्याने १११ वरदशंकर पूजा करण्यात येणार आहेत. संपूर्ण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमांचा व दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.तसेच उभादांडा सागरेश्वर मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी व पर्यटकांनी समुद्रकिनारी गर्दी केली होती.येथेही प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होते. ग्रामीण भागातील ग्रामदैवत मंदिरांमध्येही श्रावण सोमवार निमित्त धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाले.
