भिरवंडे रामेश्वरमंदिर येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित भजनानंद सोहळ्याचा शुभारंभ

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री रामेश्वरमंदिर येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित श्रावणमास निमित्ताने दर सोमवारी दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत भजनानंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
1ऑगस्ट रोजी या भजनानंद सोहळ्याचे दीपप्रज्वलन माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी रमेश सावंत, महेंद्र सावंत , महादेव (आबा ) सावंत, सत्यवान सावंत, ग्रामस्थ व भजन प्रेमी हजर होते.
पहिल्या श्रावण सोमवारी अभिषेक शिरसाठ, विजय परब , रामदास कासले यांनी सुस्वर संगीत भजने सादर करून या भजनानंद सोहळ्याची शोभा वाढवून मंदिर परिसरात चैतन्य निर्माण केले. या वेळी युवा संदेश प्रतिष्ठानचे भिरवंडे गावचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व बुवांचे यूवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार रमेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भजन प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

You cannot copy content of this page