किल्ले सोनगड वृक्षसंवर्धन मोहीम यशस्वी

‘दुर्ग मावळा’ कोकण विभागाचा उपक्रम

सावंतवाडी ता.०१- : दुर्ग मावळा प्रतिष्ठानने यावर्षीपासून किल्ले सोनगडवर संवर्धन मोहिमा राबवत आहे.त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सोनगडवर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत पूर्ण दिवस गडावर हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत किल्ले सोनगडवर वडाची पाच व कदंबची पाच झाडे लावण्यात आली. या उपक्रमाला दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, सामाजिक उपक्रम विभाग प्रमुख समीर धोंड, किल्ले सोनगड संवर्धन टीम प्रमुख सुहास गुरव, संकेत सावंत, सर्वेश नाईक, अक्षय वराडकर, सोनवडे ग्रामस्थांपैकी नारायण गावडे, दिगंबर गुरव, अरुण गुरव, विजय देवलकर, सुरज गुरव, अरुण गुरव, शिवराम गुरव, हेमंत गुरव, रामचंद्र चव्हाण, महेश चव्हाण, निलेश गुरव, नयन गुरव, अजित कासले, काशीराम गुरव, रामचंद्र गुरव, वनिता गुरव, सुनिता गुरव, रश्मी गुरव, योगेश येरम, संजय मळगावकर, शिवाजी परब, योगेश शर्मा इत्यादी उपस्थित होते.
सदर वृक्षारोपण मोहिमेसाठी युवराज राठोड यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाच झाडे, विश्राम दिगंबर गुरव यांनी पाच झाडे दिली. उपस्थित मावळ्यांना अल्पोपहार, चहा व जेवणाची सोय दिगंबर विश्राम गुरव यांनी केली. उपस्थित ग्रामस्थांनी गडावरील दुर्ग प्रेमींच्या सोयीसाठी बांधलेल्या निवाऱ्याचे छप्पर दुरुस्त केले. सर्व उपस्थित सोनवडे ग्रामस्थांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page