सावंतवाडी ता.०१- : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त सावंतवाडी संस्थांनाच्या आराध्य दैवत श्री देव पाटेकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
श्रावण महिन्यापासूनखऱ्या अर्थाने सणांना सुरुवात होते. तसेच विविध प्रकारची व्रत वैकले श्रावणात येत असल्याने या महिन्यात उपवास धरणाऱ्यांची संख्याही अधिक असते. त्यामुळे श्रावण महिन्याला हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मंदिररांवरही निर्बंध असल्यामुळे भाविकांना श्रावण महिन्यात सुद्धा मंदिरात दर्शन घेता आले नाही. मात्र यंदा कोरोनाची लाट ओसरल्याने श्री देव पाटेकराच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी रांगेत राहून देवाला केळी, नारळ ठेवून दर्शन घेतले.
