भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्स च्या संयुक्त विद्यमाने आयोजन
वेंगुर्ले ता.०१-: भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था (रजि) व सतर्क पोलीस टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे १० वी व १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आला. यावेळी शिरोडा व आरवली गावातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्तेसत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अतिथी म्हणून बा.म. गोगटे कनिष्ट विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक पांडुरंग कौलापुरे त्याचप्रमाणे संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर, केतन चव्हाण, निलेश राणे, चंद्रकांत साळगावकर, भूषण मांजरेकर, बाळा जाधव, महादेव मराठे यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या एकूण ६५ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित असलेले अतिथी प्राध्यापक पांडुरंग कौलापुरे, संस्थेचे कोकण विभाग सल्लागार कृष्णा मराठे यांच्यावतीने त्यांचे बंधू महादेव मराठे यांचा व सूत्रसंचालन करणारे रंगकर्मी बाळा आपटे गुरुजी यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
आरवली गावातील कुमारी तिलोत्तमा अर्जुन शेलटे – ९८.६०% सर्वोत्तम गुण प्राप्त करून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आली. त्याचप्रमाणे कुमारी.सेजल संजय भुबे- ९३.८०% व कुमारी दर्शना दत्तात्रय प्रभुआजगावकर या आरवली गावातून प्रथम तीन विद्यार्थीनी सर्वोत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्याचप्रमाणे १२ च्या परीक्षेत कुमारी. इशा शशिकांत लाड -८९.५०% , कुमारी. सानिया संतान सोज ८८.८३% व कुमारी. ब्लेसिया नेपोलिन जेशल ८३.००% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. वपोनी अतुल जाधव यांचे संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थी गुणगौरव सोहळा यशस्वी व्हावा याकरिता संस्थेचे आयोजन समिती पदाधिकारी सौ.कमल पडवळ, सौ.तृप्ती साळगावकर, सिद्धेश शेलटे, आबा चिपकर, बाळा जाधव, सौरभ नागोळकर, राजेश सातोसकर, रविंद्र राणे, अरुण कांबळी, बाबल शेलटे, दया कृष्णाजी, मुरलीधर राऊळ, दिलीप साळगावकर, नेपोलिन जेराळ, रामचंद्र गावडे यांनी मेहनत घेवून सहकार्य केले.
संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी सर्वांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.
