कणकवलीतिल शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सेवाविषयक प्रलंबित ठेवल्याचा आरोप;न्याय न मिळाल्यास प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२३-:* बोर्डवे आश्रम शाळेचे संस्थाध्यक्ष यानी सेवाविषयक 18 वर्षे प्रलंबित ठेवले आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदासाठी आपण पात्र असताना प्रभारी चार्ज दुसऱ्याकडे देवून आपल्यावर अन्याय करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत शनिवार पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे. आपल्याला न्याय न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहन करणार, असा इशराही त्यांनी दिला आहे. कणकवली पंचायत समितीमध्ये सध्या शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेले कैलास राऊत हे बोर्डवे आश्रम शाळा येथे मुख्याध्यापक पदावर १२ जुलै १९९३ पासून १३ जुलै २००६ पर्यंत कार्यरत होते. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या सेवाविषयक बाबी १८ वर्षे प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. याबाबत शिक्षणाधिकारी, समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे त्यांनी लक्ष वेधले होते. कोणत्याही सक्षम कारणा शिवाय २००२ ते २००६ अशा पाच वेतनवाढी मंजूर केलेल्या नाहीत. वरिष्ठ वेतन श्रेणी अद्याप मंजूर केलेली नाही. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे १ जानेवारी २००६ रोजीची वेतन निश्चिती करण्यासाठी अद्याप प्रस्ताव पाठविलेला नाही. पाचव्या वेतन आयोगाच्या निश्चिती बाबतही आपल्यावर अन्याय केला होता. आश्रम शाळेतील कालावधीत सेवा पुस्तकावर अध्यक्ष यांनी सह्या केलेल्या नाहीत. आपल्या सेवेबाबत व सेवा पुस्तकाबाबत समाज कल्याण विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच वरिष्ठ कार्यालय व न्यायालयाकडून आदेश देऊनही आश्रम शाळा संस्थेकडून त्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आपण राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांचे लक्ष वेधून दाद मागितली होती. तरीहीआपल्या न्याय मागणीबाबत प्रशासनाचे लक्ष दिले नाही. हे लक्ष वेधण्यासाठी आजपासून आपण उपोषणाला बसलो असून येत्या 26 जानेवारीपर्यंत याची दखल न घेतल्यास आपण आत्मदहन करणार, असा इशारा विस्तार अधिकारी कैलास राऊत यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

You cannot copy content of this page